Cinema Lovers Day: सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीव्हीआर-आयनॉक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी सांगितले की, ‘नॅशनल सिनेमा डे’च्या यशापासून प्रेरणा घेऊन आम्ही सिनेमा लव्हर डे साजरा करणार आहोत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा दिवस खूप खास आहे. तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.’ महत्वाचे म्हणजे, ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची ही ऑफर आहे. २३ फेब्रुवारीला तुम्ही फक्त ९९ रुपयांमध्ये कोणताही चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
२३ फेब्रुवारी २०२४ हा ‘सिनेमा लव्हर डे’ आहे. या दिवशी तुम्ही तुमचा आवडता नुकताच रिलीज झालेला चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. देशातील प्रमुख मल्टीप्लेक्स पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेड ही खास ऑफर घेऊन आले आहेत. त्यासाठी तुम्ही या संधीचा फायदा करून घेऊ शकता आणि फक्त ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता.
महत्वाचे म्हणजे, २३ फेब्रुवारीला यामी गौतमचा ‘आर्टिकल 370′, विद्युत जामवालचा’क्रॅक’ आणि शइिवा चड्ढाचा ‘ऑल इंडिया रँक’ हे चित्रपट रिलीज होणार आहेत. पीव्हीआर-आयनॉक्सच्या ऑफरनुसार २३ फेब्रुवारीला रिलीज होणारे हे चित्रपट देखील तुम्ही फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता.