आनंदाची बातमी… रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरतीत वयोमर्यादा वाढली, आता ‘या’ उमेदवारांनीही अर्ज करता येईल

Railway ALP Recruitment 2024:  रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने असिस्टंट लोको पायलटसाठी अर्ज करण्याचे वय वाढवले ​​आहे. यासंदर्भात रेल्वेने अधिसूचनाही दिली आहे. उमेदवार वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करत होते, त्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला. असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 5696 पदांसाठी भरती करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे.

रेल्वेने दिलेल्या अधिसूचनेनुसार, वयोमर्यादेत शिथिलता दिल्यानंतर, उमेदवार 31 जानेवारी 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

वयात किती सूट ?
वयात ३ वर्षांपर्यंत सूट दिली जाणार आहे. आता सर्वसाधारण श्रेणीसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे करण्यात आली आहे. याआधी अर्जासाठी सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली होती. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. आता 1 जुलै 2024 पासून वयाची गणना केली जाईल.

अर्जासाठी पात्रता..
अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संबंधित शाखेतील तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदविका असावा. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC आणि ST प्रवर्गासाठी 250 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल.