‘आप’चे कैलाश गेहलोत यांना ईडीचे समन्स, दारू घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सीएम अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने आता शनिवारी कैलाश गेहलोत यांच्यावर आपली पकड घट्ट केली आहे.

कैलाश गहलोत यांच्यावर एक्साइज पॉलिसी ड्राफ्ट तयार केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांचा आरोप आहे की आप नेता कैलाश गहलोत हे देखील त्याच गटाचा भाग होते ज्यांनी या पॉलिसीचा ड्राफ्ट तयार केला होता. इतकेच नाही तर आप नेते गेहलोत यांच्यावर मद्य व्यापारी विजय नायर याला आपलं सरकारी घर दिल्याचा आरोप देखील आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये वाहतूक, गृह आणि कायदा विभाग असलेले नजफगढमधील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गेहलोत यांना या प्रकरणाच्या संदर्भात फेडरल एजन्सीने अटक केली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांमुळे गेहलोत यांना चौकशीत त्यांचे म्हणणे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.