---Advertisement---

आपत्ती व्यवस्थापनाची प्रशिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करा

by team
---Advertisement---

जळगाव :  जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी केल्या.कवयित्री बहणिाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठात महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन व संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन विभागास पाठविण्यात आला आहे.

या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विद्यापीठात मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माहेश्वरी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समि तीचे सदस्य अॅड. अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित परिविक्षाधीन जिल्हाधकिारी तथा फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जिल्ह्यात अतिशय उच्च दर्जाची, आंतरराष्ट्रीय लौकीक होईल, अशी एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रविंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी यावेळी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा प्रस्तावाचे सादरीकरण केले. विद्यापीठाच्यावतीने या संस्थेसाठी ३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. ना. पाटील म्हणाले, विद्यापीठाने यांच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा. या संस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मान्यता घेण्यात येईल. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने संशोधन करण्यात येणार आहे. याबाबतचा जिल्हा प्रशासन व विद्यापीठात यावेळी संयुक्त करार करण्यात आला. यावेळी महसूल सहायक पदावर अनुकंपा नियुक्ती देण्यात आलेले महिला व पुरूष अशा दोन्ही उमेदवारांना मदत व पुनवर्सन मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment