पाचोरा : आमदारकीची स्वप्ने पाहणारे हौसे-गवसे-नवसे यांनी माझ्याविरोधात निवडणूक जरूर लढवावी. मात्र भाजप आणि ना. गिरीश महाजन यांना ढाल न करता समोर येऊन लढावे. पीककर्ज व पीकविम्याचा बागुलबुवा दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असा खरमरीत टोला आमदार किशोर पाटील यांनी भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना लगावला.
जिल्हा बँकेकडून पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत अमोल शिंदे यांनी निशाणा साधला होता. त्यावर आमदारांनी हे प्रत्युत्तर दिले. जिल्हा बँकेकडून जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना कर्ज वितरण सुरळीतपणे झाले असून अपवादात्मक परिस्थितीतच एखादा शेतकरी वंचित राहिला असावा. जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर बँकेला कर्ज देता येत नाही. या नियमाचा भंग झाल्यामुळेच जिल्हा बँकेचे तत्कालीन चेअरमन व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना अडचणींचा सामना करावा लागला होता, असा हवालादेखील आमदार पाटील यांनी या वेळी दिला.
दरम्यान, पाचोरा-भडगाव तालुक्यास दुष्काळी घोषित करण्यात आले नाही, या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात केवळ चाळीसगाव तालुक्याचा दुष्काळी निकषात समावेश आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर तालुकादेखील दुष्काळाच्या निकषात बसला नाही. मग अमोल शिंदे हे ना.महाजन यांच्याबाबतही असे प्रश्न मांडणार का, हे त्यांनी स्पष्ट करावे. शिंदे यांनी तथ्य नसलेले, भंपक विषय सांगून लोकांची दिशाभूल करू नये, असे आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.
अमोल शिंदे भाजपचे नाही, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष
लोकसभा निवडणुकीत खासदार स्मिता वाघ यांच्या विजयासाठी प्रवे महायुतीचा घटक पक्ष म्हणून ३ आम्ही एकनिष्ठेने काम केले. मात्र आ विधानसभा तोंडावर आली असताना प्रवे भाजप तालुकाध्यक्ष आमच्याविरोधात उमे बोलत असेल तर त्यांचा बोलविता घेण धनी कोण? हे भाजपच्या नेतृत्वाने स्था स्पष्ट करावे. लोकसभेतील आघाडीचे उमेदवार व अमोल शिंदे यांचे मित्र प्रधि करण पवार आणि माजी खासदार वी उन्मेश पाटील यांच्यासोबत मातोश्रीवर सर्व गेलेल्या व विधानसभेची उमेदवारी अभ वैशाली सूर्यवंशी यांना मिळणार, ४८ तुला नाही असं समजताच मागच्या कम दाराने पळ काढणाऱ्या अमोल शिंदे २० यांनी मी १०० दिवसांचा आमदार एकू हे सांगण्यापेक्षा तुम्ही किती दिवस तालुकाध्यक्ष राहणार हे पाहावे, असा डि टोला आमदार पाटील यांनी लगावला.
अमोल शिंदे आणि वैशाली सूर्यवंशी यांच्या शैक्षणिक संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढणार
पत्रकार परिषदेत आमदार किशोर पाटील यांनी अमोल शिंदे आणि उबाठाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, यांच्या शैक्षणिक संस्थेत शालेय फी, बसभाडे यांच्यामध्ये प्रचंड आर्थिक गैरव्यवहार होत आहेत. युनिफॉर्मची शिलाई करणारा टेलर तसेच बूट पुरवणाऱ्या दुकानदारांकडूनही हे कमिशन घेतात. शिवाय शिंदे यांच्या अनुदानित शासकीय शाळेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जातात आदी मुद्दे उपस्थित करून या विषयाला वाचा फोडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले