---Advertisement---

आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण

---Advertisement---

सोयगाव : सोयगाव आगारात दाखल झालेल्या नवीन ५ अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव आगरासाठी पहिल्या टप्यात १० अत्याधुनिक बस मंजूर झालेल्या आहेत. त्यातील ५ बसेस आज सोयगाव आगरास प्राप्त झाल्यात. उर्वरित बसेस लवकरच सोयगाव आगारात दाखल होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

नवीन अत्याधुनिक बससेवा अधिक सुरक्षित,आरामदायक आणि पर्यावरण पूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे साध्या दरात या बसने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी केले.

---Advertisement---


यावेळी आमदार सत्तार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नवीन बसमधून एसटी डेपोपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील जुना बाजार पट्टा, भवानी माता मंदिर,शेंदुर्णी बायपास ते संत गाडगेबाबा चौक यामार्गे शहरात फेरी मारली.नवीन बस अतिशय आरामदायी असल्याची प्रतिक्रिया यावेळी आ.अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

दाखल झालेल्या नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,यांचे आभार मानले.

दि.१८ मार्च रोजी मुंबई येथे आ. अब्दुल सत्तार व परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत सिल्लोड व सोयगाव आगारास प्रत्येकी २० नवीन बसेसची उपलब्धता करून देण्याची मागणी आ.सत्तार यांनी केली होती. यानुसार मंत्री प्रताप सरनाईक यांनी सिल्लोड आणि सोयगाव आगरासाठी तात्काळ प्रत्येकी ५ या प्रमाणे १० बसेस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी सिल्लोडला ५ नवीन बस मिळाल्या तर त्यातील पाच बसेस आज सोयगाव आगारास उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शहरप्रमुख संतोष बोडखे, जि. प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, माजी सभापती रामदास पालोदकर, सिल्लोडचे माजी उपगराध्यक्षा विनोद मंडलेचा, सोयगाव नगरपंचायत शिवसेना गटनेता अक्षय काळे, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, प्रशांत क्षीरसागर, गोपीचंद जाधव तसेच आगार प्रमुख मनीष जवळीकर, स्थानक प्रमुख सतीश अंभोरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल यांच्यासह युवासेनेचे कुणाल राजपूत, नगरसेवक कदिर शहा, रमेश गव्हाडे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण राठोड,श्रावण जाधव,सरपंच सुरेश चव्हाण, विक्रम चौधरी,जीवन पाटील,भारत तायडे,मोतीराम पंडीत,सोयगाव आगारातील आगार प्रमुख मनिष जवळेकर, स्थानक प्रमुख संतिष अंभोरे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल,वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर,सह प्रशासकीय यांत्रिकी व चालक,वाहक मोठ्या संख्येने आदिंची उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---