आमदार आशिष शेलार यांची मागणी, आणि विधानसभा अध्यक्ष्यांनी दिले जरांगेच्या ‘एसआयटी चौकशीचे’ आदेश !

मुंबई : कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यातील अनेक विषयांवरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत, मनोज जरांगेची एसआयटी चौकशी सुरु करा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिले.

अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये मनोज जरांगेची एसआयटी चौकशी करा. यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश दिले. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. यावेळी आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी, जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी केली

शेलार म्हणाले, “महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कोणी ठरवलं? ही केवळ धमकी आहे का? या मागची भूमिका काय? यामध्ये संशय आहे का? यात कोणी कट-कारस्थानं केली आहेत का? त्यामुळं शांत बसू नका, अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडं केली. दरम्यान, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी, अशी मागणी केली.