बुलढाणा : आमदार संजय गायकवाड नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी एका मुलाखतीत आपण १९८७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असं वक्तव्य केलं होत. त्यामुळे ते वादात सापडले आहे.
आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे आमदार गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मोताळा तालुक्यातील राजूर गावात उपाध्याय यांची दीड एकर शेती आहे. आमदार गायकवाड यांनी २०२१मध्ये त्यांच्या शेतजमिनीवर अतिक्रमण केले. असा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. आम्ही जेव्हा त्यावर आक्षेप घेतला, तेव्हा मला जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. अशी तक्रार रिटा उपाध्याय यांनी दिली होती.
त्यानंतर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गायकवाड व त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ चौघांविरोधात 156 ( ३ ) नुसार १४३, १५०, ३७९, ३८५, ४४७ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.