जळगाव : अमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्याच्या घटना दररोज घडत आहेत. नोकरीची ऑफर्स किंवा कॅशबॅक यासह विविध प्रकारचे अमिष दाखविणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करु नये, असे आवाहन रिर्झव्ह बँक ऑफ इंडियातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.अशा लिंकवरुन ग्राहकांना कॅशबॅक, आकर्षक रिटर्न्स, त्वरित कर्ज, नोकरी, गुंतवणूक करुन जास्तीचा नफा मिळवा, असा वेगवेगळा फंडा वापरुन ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रकार अनोळखी लिंकवरुन केला जात आहे. अशा अनोळखी लिंकवर क्लिक करु नये.
किंवा कोणताही प्रतिसाद देवू नये. असेही बँकेने स्पष्ट केले आहे. फसवणूक टळावी यासाठी सावधगिरी बाळगण्याचे संदेश ग्राहकांना मोबाईलवरही आरबीआय देत आहे. पॉलिसी म्यॅचूअर झाली आहे, त्यावर अधिक बोनस मिळेल, मेडीक्लेम सुविधा मिळतील असे अमिष दाखविणारे मेसेज, कॉल यावर विश्वास ठेवून रक्कम भरु नये. आपल्या बँक खाते, बँक खात्याची माहिती कोणाला देवू नये. आधारकार्ड, पॅनकार्ड, ई- मेल आयडी माहिती देवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाणे तर्फे करण्यात आले आहे.