‘आम्हालाही शिकायचे आहे’ उपक्रमांतर्गत, केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे होणार वाटप

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘आम्हालाही शिकायचे आहे’ या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.शैक्षणिक क्षेत्रातील विशेष मार्गदर्शन वर्ग हा प्रकल्प गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहे. या प्रकल्पाचे माध्यमातूनच पाचवी ते आठवीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी म ोफत शिकवणी वर्ग घेतले जातात. रोजंदारीवर काम करणारे, हमाल, हातगाडीवर धंदा करणारे, मोलम जुरीसाठी जाणाऱ्या महिला पालकांच्या पाल्यांना शालेय पाठ्यपुस्तके घेता येत नाही, अशा इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक सहयोग योजनेत ही पुस्तके देण्यात येणार आहे.

वस्ती भागात प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांअभावी शाळेत जाणे टाळतात, तर काही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या याठिकाणी आढळून आली. वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रेरणा व गती मिळावी या हेतूने या योजनेची सुरुवात झाली. पुस्तकांचे वितरण करताना ही पुस्तके फुकट मिळत आहे, ही भावना त्यांच्यात रुजू नये म्हणून २०० रु. अनामत रक्कम घेण्यात येते व वर्ष संपल्यावर पुस्तक परत करतेवेळी १५० रु. संबंधित विद्यार्थ्याला परत करण्यात येतात.

या योजनेत हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, राजीव गांधी नगर, शनिपेठ, कांचन नगर, चौघुले प्लॉट, असोदा, भादली, कानळदा, फुफनगरी भागातील विद्यार्थी पुस्तके घेऊन जातात. दरवर्षी या पुस्तकांना बुक बाइंडीग करण्यात येऊन आवश्यकतेनुसार नवीन पुस्तके घेण्यात येतात. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान, २७३ नवी पेठ, जळगाव येथे संपर्क साधावा