जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांची आज जळगावात शिवतीर्थ मैदानात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकार नको आम्हाला आमच्या हक्काच भारत सरकार पाहिजे असे विधान केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
शिवसेना काका पुतण्याला एकत्र आणते आणि भारतीय जनता पक्ष आहे तो घर फोडतो. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोतच राम मंदिरामध्ये त्याच्या उभारणीमध्ये त्या सगळ्यांमध्ये हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. येत्या 4 जूनला लोकशाहीचा विजय संपूर्ण भारत साजरा करणारे मोदी सरकारचा विसर्जन करणार आहे. एक माणूस उमेदीने काम करत असतो आणि खरं सांगतो तुम्हाला काम करतोय आणि गाडी कुठेतरी रुळावर येते अशा वेळेस तुम्ही त्याला बाजूला करता तुम्ही कोणाला उमेदवारी द्यायची तुम्ही द्या तेव्हा माणसं वापरायची पक्ष वापरायचे आणि त्यांचे उपयोग संपला. देवेंद्र फडणवीस जे बोलतात विकासाचे डबे आहेत काय बोलतात की मोदींच्या इंजिनला विकासाची डबे आहेत. अहो देवेंद्रजी डबे विकासाचे तुम्हाला वाटत असतील पण त्याला भ्रष्टाचाराची आहेत.
भाजपचा पक्ष राहिलेलाच नाहीये भाजपा पूर्वीसारख्या राहिलेलंच नाहीये एक तर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र मध्ये जे गद्दारीचे राजकारण सुरू केलं ते म्हणजे हिंदुत्व नाहीये. मी ताट पाणाने उभा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लुटला गेलेल्या वैभव मी पुन्हा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या उद्योग धंदे तुम्ही महाराष्ट्रातून नेले वित्तीय केंद्र गुजरातला नेलं पार गुजरातला नेला मेडिकल डिवाइस पार्क गुजरातला गेला वेदांत फॉक्स्वान गुजरातला नेला डायमंड मार्केट गुजरातला नेला हे सगळे जे काय आहे हे महाराष्ट्राची झालेले लोक त्याची व्याजासकट वसुली करून मी पुन्हा महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांना तुमचा जो काही हमीभाव आहे त्या वेळेला मी तुम्हाला देऊन दाखवला होता तो तुमचा हमीभाव इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक माझा एक प्रयत्न आहे की तुमच्या खतावती बी बियाणं कीटकनाशक याच्यावरती आहे तो जीएसटी मी माफ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. मोदी सांगते की समोरच्या भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत म्हणून आम्हाला मोदी सरकार नको आम्हाला आमच्या हक्काच भारत सरकार पाहिजे.