‘आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं’ सभेत बोलताना अजित दादा झाले भावुक

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काल राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील निकाल देत विधानसभा अध्यक्षांनी आमदार आपात्रता प्रकरणात निकाल देताना अजित पवारांचा गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता दोन्ही गटांकडून निवडणूकांच्या तयारीला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यालवेळी ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. बोलत असताना त्यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे ते म्हणाले, वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली. जो व्हीप द्यायचा आहे तो आमच्या बरोबर आहे. उगीच आमची बदनामी का करता असं ते म्हणाले

यावेळी अजित पवार म्हणाले की, पंधरा वर्षात आम्हाला फोन नाही, आता आम्हाला फोन येतो. विचारपूस केली जाते. पाणी कसं आहे, कसलं पाणी शेतीच पाणी की पिकाच पाणी नक्की कसलं पाणी. काय काय आम्ही तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही विसरून जाताय हे बरोबर नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी महायुती केली आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत.