आयपीएल २०२४ ची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या टप्प्यात २१ सामन्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण त्याआधी आयपीएल २०२४ चा अंतिम सामन्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम् स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, तर दुसरा क्वॉलिफायर सामनाही चेन्नईत होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दूसरा क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गत वर्षीच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर सुरुवातीचे सामने व अंतिम सामने आयोजित करण्याची परंपरा पाळली आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
वेळापत्रक लवकरच
बीसीसीआयने लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा लक्षात उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल. गत आयपीएल हंगामातील विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर आयपीएल सुरू करण्याची आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा आहे. पण कोरोना काळात या परंपरेचे पालन करता आले नव्हते, पण गत हंगामात (२०२३) आयपीएलच्या सलामीचा आणि अंतिम सामना केवळ विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवला गेला.