‘आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना’ ७० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना विनाअट लागू, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ या प्रमुख योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट न घालता, पर्वा न करता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा मंजूर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेमधील उत्पन्नाची अट काढून टाकून ७० वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे लाभ सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांसह अंदाजे ४.५ कोटी कुटुंबांना कौटुंबिक आधारावर ५ै लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा कवच लाभण्याचे हे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक परिवहन प्राधिकरणांद्वारे ई-बस खरेदी आणि संचालनासाठी मंत्रिमंडळाने पीएम ई बस सेवा-पेमेंट सुरक्षा यंत्रणा (पीएसएम) योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना आर्थिक वर्ष २०२४- २५ ते आर्थिक वर्ष २०२८-२९ पर्यंत ३८,०००हून अधिक इलेक्ट्रिक बसेस (ई-बस) तैनात करण्यास समर्थन देईल. ही योजना तैनातीच्या तारखेपासून १२ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ई-बस चालवण्यास मदत करेल. मंत्रिमंडळाने दोन वर्षांच्या कालावधीत १०,९०० कोटी खर्चासह इनोव्हेटिव्ह व्हेईकल एन्हांसमेंट (पीएम ई-ड्राइव्ह) योजनेतील पीएम इलेक्ट्रिक ड्राइव्ह क्रांती योजनेसदेखील मंजुरी दिली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेचा खर्च रु. १०,९०० कोटी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज “आर्थिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ दरम्यान प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत अंमलबजावणीसाठी ग्रामीण विकास विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत ६२,५०० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी पात्र २५,००० जोड नसलेल्या वस्त्यांना नवीन कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आणि नवीन कनेक्टिव्हिटी रस्त्यांवर पुलांचे बांधकाम/उन्नतीकरण करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. या योजनेचा एकूण खर्च ७०,१२५ कोटी रुपये आहे.

‘मिशन मौसम’साठी २ हजार कोटी रुपये
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मिशन मौसम’ ला मंजूरी दिली असून त्यासाठी दोन वर्षांमध्ये २,००० कोटी खर्चाची तरतूद केली आहे. मिशन मौसमचा एक भाग म्हणून, भारत संशोधन आणि विकास आणि वातावरणीय विज्ञान, विशेषत: हवामान निरीक्षण, मॉडेलिंग, अंदाज आणि व्यवस्थापन यामधील क्षमता विस्तारित करेल. प्रगत निरीक्षण प्रणाली, उच्च-कार्यक्षमता संगणन, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून, मिशन मौसम उच्च अचूकतेसह हवामानाचा अंदाज घेण्यासाठी एक नवीन बेंचमार्क सेट करेल.