आयुष प्रसाद: नॅट टेस्टेड रक्त पुरविणारा जिल्हा म्हणून नवी ओळख मिळवणार

जळगाव : नॅट टेस्टेड रक्त पुरविणारा जिल्हा आणि पुरवठा करणारी रेडक्रॉस सोसायटी म्हणून राज्यात जळगावची नवी ओळख निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष्ा तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रेडक्रॉस सोसायटीबाबत समाजात गैंरसमज पसरविले जात आहेत. मात्र त्याची माहिती घेतली असता ते चुकीचे असल्याचे दिसून आले. रेडक्रॉसच्या जळगाव शाखेचे कार्य चांगले असून राज्यपालांनीही त्याचे कौतुक केले आहे. रेडक्रॉसचे काम अधिक गतीमान व सुविधा युक्त होण्यासाठी विविध दहा समित्यांचे गठण केले आहे. त्याच्याव्दारे विविध उपक्रम व सेवा सुविधा राबविण्याबाबतचे नियोजन केले आहे. या उपक्रमांसाठी विविध कंपन्यांकडून सीआरएस फंडही जमा करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात शहरासह गावागावात रेडक्रॉस सोसायटी विविध आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी तत्पर असणार आहे.

नॅट टेस्टेड रक्त पुरवणारा जिल्हा होणार

रेडक्रॉस सोसायटीत विविध चाचण्या करणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. तसेच रक्तदातेही आहेत. त्यामुळे या सर्व रक्तांवर नॅट टेस्ट करून ते सुरक्ष्ाित रक्त रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध भागात रक्त संकलन करून ते जिल्ह्याबाहेर गरजेनुसार पुरविण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात नॅट टेस्टेड रक्त पुरविणारा जिल्हा करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. त्यानुसार सहा महिन्यात आरोग्य विषयक तक्रांरी कमी होतील.

दहा समित्यांमधुन 150 जणांची टिम

रेडक्रॉस सोसायटीचे काम जिल्हाभरात होण्यासाठी दहा समित्यांचे गठण करण्यता आले आहे. यात दहा समित्यांमधुन सुमारे 150 जणांची टिम काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.