आरसीबीची नवीन जर्सी कोरोनायोद्धयांना समर्पित

बंगळुरु: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपल्या संघाला नवीन निळी जर्सी देणार असून ही नवीन जर्सी आघाडीच्या कोरोना योद्ध्यांना समर्पित करण्यात आली आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जागरूकता पसरवण्यासाठी संदेश देणारी ही विशेष ‘ब्लू जर्सी’ आहे. भारतात लसीकरणासाठी निधी गोळा करण्यासाठी या ब्ल्यू जर्सीचा लिलाव केला जाईल. आरसीबीने यावर्षी मे महिन्यात कोरोनामुळे आयपीएल स्थगित होण्यापूर्वी गो-ग्रीन’ उपक्रमाऐवजी आपल्या संघाला निळ्या रंगाची (ब्लू जर्सी) जर्सी देण्याची घोषणा केली होती.

वचनाची पूर्तता करीत शनिवारी आभासी पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली व आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी या नवीन जर्सीचे अनावरण केले. गतवर्षी कोरोना संसर्ग पसरल्यापासून आरसीबीची पालक कंपनी डायजियो इंडियाने कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ७५ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बंगळुरू व इतर शहरांमध्ये मदतकार्य वाढवण्यासाठी सुमारे १०० युनिट्स ऑक्सिजन कन्सेंट्रेटर्स उपलब्ध करून दिले.’ब्लू जर्सी’चे अनावरण करताना विराट कोहली व प्रथमेश मिश्रा