आव्हाडांनी घेतला अजित पवारांचा समाचार, काय म्हणाले वाचा सविस्तर ?

मुंबई: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यालवेळी ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. बोलत असताना त्यांनी शरद पवार गटावर टीका केली आहे ते म्हणाले, वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. ‘आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्ष पद मिळालं असतं’

या टिकेला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला अधिकृतरित्या अध्यक्ष होण्यापासून कुणी वंचित ठेवलं होतं? तुम्ही आजपर्यंत पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात? पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? तुम्ही रस्त्यावर एखादं आंदोलन केलेलं आहे का? आपल्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणती पोलीस केस आहे का? तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं, अश्या प्रश्नाद्वारे आव्हाडांनी टीका केली

पुढे ते म्हणाले, तुमचे आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांचे किती सुमधूर संबंध होते हे आम्हाला चांगलं माहिती आहे. सत्तेच्या लालचेपोटी तुम्ही एकत्र आले. राहा पण उगाच शरद पवारांना डसायला जाऊ नका, ”बात निकलेगी तो दूर तलक जायेगी”, असहि आव्हाड म्हणाले शिखर बँकेमध्ये तुम्ही लोचे केले आणि ते सर्व आलं शरद पवारांवर. त्या प्रकरणात लगेच दु:ख व्यक्त करत तुम्ही राजीनामा दिला. चारवेळा जे उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त शरद पवारांमुळे मिळालं. हे उपकार मनात तरी ठेवा.

जो नाही काकांचा, जो नाही बहिणीचा, जो नाही काकींचा, ज्या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा. उत्तर आम्हालाही देता येतं. फक्त साहेबांवर बोलणं टाळा, ही विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्या तोंडावर पडतंय. ८४ वर्षांच्या म्हाताऱ्याला तुम्ही असं टोचून बोलणार असाल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीय, असंही जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले.