जळगाव : सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल ९३.८४ लागला आहे. विद्यालयातील आदिती किशोर कोल्हे ९३.८०, मिताली रामदास भारुळे ९२.८०, फाल्गुनी पुरुषोत्तम कोल्हे ९०, ममता किरण चौधरी ८८.६० , गायत्री महेंद्र चौधरी ८७.२० या विद्यार्थ्यांनी पहिले पाच क्रमांक मिळविले. शाळेतून विशेष प्राविण्यासह ४२, फर्स्ट क्लास मध्ये ४१ सेकंड क्लास मध्ये 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विलासराव चौधरी, सचिव कमलाकर सावदेकर,चेअरमन उद्धवराव पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी अभिनंदन केले आहे. सर्व पाचही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, डी. जी. महाजन,सचिन जंगले, एल .जे.भुगवड्या, के. बी. तायडे, एस. के. राणे राजपूत,अरविंद महाजन, रितेश गायकवाड, विलास जोशी यांनी सत्कार केलेत.