जळगाव : येणाऱ्या निवणुकीबाबात मी बोलायला आलो आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणूक आहे. विकसित भारत बनण्यासाठी ही निवडणूक आहे. पुढच्यावेळी व्यासपीठावर वेगळे नेते असतील पण युवकांचा विकास झालेला असेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी इंडिया आघाडी फक्त त्यांच्या मुला मुलींना सत्तेत बसवण्यासाठी आहे, अशी टीकाही केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर आहेत. आज जळगावात सागर पार्कवर भाजप युवासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात अमित शाह युवकांसोबत संवाद साधला. आगामी निवडणूक २०४७ च्या विकसित भारतासाठी आहे. भाजप आणि मोदींची नाही तर ही तुम्हा युवकांची निवडणूक आहे. ही तरुणांची निवडणूक आहे.
इंडिया आघाडी फक्त त्यांच्यामुलांसाठी – अमित शाह
मोदींविरोधात तयार झालेली आघाडी कमजोर आहे. घराणेशाही पुढे नेणारा पक्ष देशाचा विकास करु शकत नाही. इंडिया आघाडी फक्त त्यांच्या मुला मुलींना सत्तेत बसवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. सर्व पक्ष घराणेशाही माणनारे आहेत, असे अमित शाह म्हणाले.
सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला
मोदींनी ३७० कलम हटवले आणि खऱ्या अर्थाने काश्मिरला भारतासोबत जोडले. सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला. आगामी निवडणूक भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आहे.
शरद पवार यांना लगावला टोला
देशाला सुरक्षित आणि समुद्ध करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींना पुन्हा संधी दिल्यास अर्थव्यस्था तिसऱ्या क्रमांकावर जाईल. मी शरद पवार यांना विचारतो. पवारसाहेब मोदींना १० वर्ष झाले पण तुम्हाला महाराष्ट्राची जनता ५० वर्ष सहन करत आहे. ५० वर्ष सोडा जनतेला ५ वर्षाचा हिशोब द्या. मी तर १० वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे, असा पलटवार अमित शाह यांनी केला.