नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आहे. काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले सत्यजीत तांबे सोमवारी नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी त्यांनी उमेदवारी नाकारणाऱ्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर खरमरीत शब्दांत टीका केली.
सत्यजीत तांबेंनी काय सुनावलं?
माझ्या बाजूने कोणीही उभं नाही, असे कोण म्हणत आहे? नाशिकमधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. इकडे पक्ष वगैरे काही नाही. अगदी शिवसेनेचे कार्यकर्तेही माझ्यासोबत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना ग्राऊंडवरची परिस्थिती काय आहे, ते माहिती नाही, हे माझे स्पष्ट मत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. यावर आता काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.