---Advertisement---
Crime News : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाल्याचे आपण वाचले असलेच. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या डॉक्टर तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पिडितेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण विवाह करू…’ असे सांगून विश्वास संपादन केला. संशयित संदीप याने एकेदिवशी पिडितेच्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधून बळजबरीने शरिरसंबंध प्रस्थापित केले.यातून पीडिता गर्भवती राहिल्याचे लक्षात आले.
याबाबत पीडितेने संशयितांस याबाबत कल्पना दिली असता, आपल्याला नको असल्याचे सांगत गर्भपात करण्या सांगितले. त्यानुसार संशयिताने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत त्या सेवन करण्यास सांगितले. ही घटना नाशिक मध्ये घडली आहे, पिडितेच्या फिर्यादीनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.