मुंबई: कंगना रणौत तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना रणौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरशिवाय कंगना रणौतने चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांसमोर सादर केला आहे.
इंदिरा गांधींच्या रूपात त्यांची एक झलक चाहत्यांना वेड लावली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे इमर्जन्सीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट मिळाली आहे, ज्याची घोषणा खुद्द कंगना रणौतने केली आहे. कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बहुगुणी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. कंगनाने या चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगना रनौत या चित्रपटात केवळ अभिनय करत नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे.
आता अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. हा फोटो शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता भारताच्या सर्वात भयंकर काळामागील कथेवर पडदा उचलला जाईल. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सर्वात निडर आणि उग्र पंतप्रधानांची कथा. थिएटरमध्ये साक्षीदार व्हा”. घोषणा करताना कंगनाने सांगितले की, हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होत आहे.