ईपीएफ असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, सलग दुसऱ्या वर्षी ईपीएफ व्याजदरात वाढ

EPFO: ज्या नोकरदारांचा पीएफ दर महिन्याला त्यांच्या पगारातून कापला जातो अशा नोकरदारांना सरकारने मोठी बातमी दिली आहे. सरकारने सलग दुसऱ्या वर्षी ईपीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी, सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी त्यात 0.05 टक्के वाढ केली होती आणि आता 2023-24 या आर्थिक वर्षासाठी त्यात 0.10 टक्के वाढ केली आहे. याचा अर्थ असा की, दोन वर्षांत सरकारने ईपीएफवरील व्याजात 0.15 टक्क्यांनी वाढ करून एकूण व्याजदर 8.25 टक्क्यांवर नेला आहे. जो 3 वर्षांचा उच्चांक आहे.

व्याजाचे किती पैसे खात्यात येतील?
EPFO ची संघटना CBT ने EPF व्याजदर 8.25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा व्याजदर ८.१० टक्के होता. आता आपण गणना करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. यासाठी एक सूत्र आहे. समजा तुमच्या पीएफ खात्यात एकूण 1 लाख रुपये जमा आहेत. तर गेल्या आर्थिक वर्षात तुम्हाला तुमच्या खात्यात ८.१५ टक्के व्याजाने ८,१५० रुपये मिळाले असतील. आता हा व्याजदर 8.25 टक्के करण्यात आला आहे. जर एखाद्या खातेदाराच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर त्याला व्याज म्हणून 8250 रुपये मिळतील. याचा अर्थ ईपीएफ खातेधारकाला १०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.