---Advertisement---

उज्ज्वला बेंडाळे : उमेदवारीबाबत पक्षादेश्याचे पालन करणार

by team

---Advertisement---

जळगाव:  भारतीय जनता पक्ष्याची  मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. मी पक्ष्ाासाठी काम करत आहे. आतापर्यंतचे माझे काम पाहून पक्ष्ााने माझ्यावर  नगरसेवकासह महानगराध्यक्ष्ापदाची जबाबदारी दिली आहे. पक्ष्ाादेशानुसारच जळगाव महापालिकेशी निवडणूक लढवून विजय मिळविला होता. पुढे मी उमेदवारी करावी की नाही याबाबतचा अंतिम निर्णय भाजपाचे श्रेष्ठी घेतील. मात्र येणाऱ्या निवडणूकीत पक्ष्ााच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महानगराध्यक्ष्ा म्हणून मी जोमाने काम करणार असल्याचे मत माजी नगरसेविका व भारतीय जनता पार्टीच्या महानगराध्यक्ष्ा उज्ज्वला बेंडाळे यांनी व्यक्त केले.गणेशोत्सवानिमित्त त्यांच्याशी ‌‘तरुण भारत लाईव्ह’तर्फे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

कामाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा

महापालिकेतील नगरसेवक म्हणून कार्यकाळ संपला असला तरी महासभेत मंजुर केलेल्या विकास कामांबाबत प्रशासकांशी समन्वय साधुन पाठपुरावा करत आहे. त्यामुळे विकासाचा जो बॅकलॉक आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला निधी दिला आहे. त्यात भाजपाच्या नगरसेवकांच्या वार्डातील विकास कामे करण्यासाठी निधी मिळाला आहे. त्यातून कामे होत आहेत.

जबाबदारी पूर्ण करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष्ा चंद्रकांत बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर महानगराध्यक्ष्ापदाची मोठी जबाबदारी दिली आहे. यापूर्वीही पक्ष्ााने मला महापालिकेत नगरसेवकाची संधी दिली आहे. आतापर्यतचे पक्ष्ाातील काम पाहून मला ही नवी जबाबदारी दिली आहे.  सन 1998 पासून मी पक्ष्ााची सामान्य कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. मी आजपर्यंत कोणतेही पद मागीतले नाही. पक्ष्ााने जी जी जबाबदारी दिली आहे. ती पूर्ण केली आहे. त्यामुळे  2024 मध्ये होणाऱ्या निवडणूकीत मी उमेदवारी करावी की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष्ा घेईल. मात्र मी पक्ष्याच्या  उमेदवारास विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही भाजपा महानगराध्यक्ष्ा उज्ज्वला बेंडाळे यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---