उत्तरप्रदेशातील सहारनपूर मध्ये कट्टरपंथींनी शिवीगाळ करत कावड यात्रा रोखली

लखनऊ : उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मुस्लिम बहुसंख्य असलेल्या गावात कावड यात्रेकरूंचा मार्ग रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सरसावा पोलीस ठाणे हद्दित शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी घडली. यावेळी कट्टरपंथीयांनी भक्तांना शिवीगाळ केली. तसेच मारहाण देखील केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा शिवभक्तांनी केला आहे. याप्रकरणी कावड यात्रेकरूंनी नजिकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

याप्रकरणात बिल्लू, शाहिद, माजिद, गुलबहार, तैमुर, फारूख महरूफ, शाकीर, शाहरूख आणि इतर काही जाणांचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात एफआरआय दाखल केली आहे. आरोपींना अटक न केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी ५ ऑगस्टला नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन एकजूटता दाखवली.

शनिवारी ४ ऑगस्ट रोजी ढिक्काकला गावातील सुधीरकुमार शर्मा यांनी पोलिसांत तक्रार केली. सुधीरकुमार शर्मा यांच्या गावाशेजारी मुस्लिम बहुसंख्य असलेले तबरा नावाचे गाव आहे. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४० वाजता कावड यात्रेकरू तबरा गावात पोहोचले होते. त्यावेळी डिजेवर सुरू असलेल्या धार्मिक गाण्याच्या ठेक्यावर यात्रेकरू आनंद घेत होते. यावेळी काही कट्टरपंथीयांनी कावड गावात जाऊ न देण्याचा कट रचला असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे तक्रार?
तक्रारीत तक्रारदाराने यमीनचा मुलगा बिल्लू, शाहिद, माजिद, गुलबहार, तैमुर, फारूख महरूफ, शाकीर, शाहरूख आणि इतर काही जणांनी कावड यात्रेकरूंना घेराव घातला. या सर्वांच्या हतात लाठी, रॉड असल्याचा दावा तक्रादाराने केला. या सर्वांनी कावड यात्रेकरूंना शिवीगाळ आणि मारहाण केली. तक्रादाराचा मुलगा या कावड यात्रेत होता. झालेल्या प्रकरणाची माहिती तक्रारदाराच्या मुलाने आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर ही माहिती अखेर पोलिसांपर्यंत पोहोचली.

याप्रकरणात आता पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांची समजूत काढली आहे.कावड यात्रेकरूंच्यावतीने सुधीर कुमार यांनी आरोपींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ आरोपिंविरोधात एफआरआय दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १२६ (२), ११९(२), ११५(२), ३२५ आणि ३०० अंतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणाला काही तास झाले असून अद्यापही अटक केली गेली नसल्याने कावड यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे.