उत्तर प्रदेशात जागावाटपापूर्वी दबावाचे राजकारण, अखिलेश यादव यांच्याकडून एकतर्फा १६ उमेदवार

उत्तर प्रदेश: समाजवादी पक्षाला कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची आहे, याची यादी त्यांनी आधीच काँग्रेसला दिली होती पण काँग्रेडकडून प्रतिउत्तर न आल्याने सपा प्रमुख अखिलेश यादव चांगलेच होते.आम्ही काँग्रेस पक्षासाठी 11 जागा सोडत आहोत,असेही त्यांनी म्हटले होते. काँग्रेसकडून कुठलेहि संकेत आणि जागावाटपावर कोणतीही चर्चा न झाल्याने त्यांनी 16 जागांवर एकतर्फी उमेदवार जाहीर केली आहे.यामध्ये डिंपल यादव, अक्षय यादव आणि धर्मेंद्र यादव यांच्या नावांचा समावेश असून ते अखिलेश यांच्या कुटुंबातील लोक आहेत.

एसपीने जाहीर केलेल्या यादीत, संभलमधून शफीकुर रहमान बुर्के, अक्षय यादव फिरोजाबाद, डिंपल यादव मैनपूर, देवेश शाक्य, एटा, धर्मेंद्र यादव, बदायूंमधून उत्कर्ष वर्मा, धौराहातून आनंद भदौरिया, उन्नावमधून अनु टंडन, राविदास मेहरोस लखनौमधून नवलकिशोर शाक्य, फारुखाबादमधून राजाराम पाल, बांदामधून शिवशंकर सिंग पटेल, फैजाबादमधून अवधेश प्रसाद, आंबेडकर नगरमधून लालजी वर्मा, बस्तीमधून राम प्रसाद चौधरी आणि गोरखपूरमधून काजल निषाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.