उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली ; आज जळगावात असे राहणार तापमान

जळगाव । राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. धुळ्याचा पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचली असून ६.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

तसेच रात्रीच्या तापमानात प्रचंड घसरण झाल्याने जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. २२ जानेवारी रोजी जळगावात किमान तापमानाचा पारा ९ अंशावर  तर कमाल तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. तर आज मंगळवारी रात्री तापमानाचा पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जळगावामधील तापमानात चढ-उतार सुरु असून मागील काही दिवसापासून किमान तापमान १० अंशावर होते. काल सोमवारी हे तापमान ९ अंशावर आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी कमालीचा गारठा होत ‎असल्याने नागरिक आता थंडीचा अनुभव‎ घेत आहे. थंडीत आणखी वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज रात्री पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच दिवसाचे तापमान ३० अंशावर असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच २८ जानेवारीपर्यंत हा पारा ३० ते ३१ अंशावर असणार आहे.