उद्धव ठाकरेंच्या घरावर हल्ला करण्याचे प्लानिंग , अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन केला

मुंबई :  शिवसेना (UBT) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या घरावतरी हल्ला  होणार असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ज्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन केला त्या व्यक्तीने दावा केला आहे की, जेव्हा तो मुंबईहून गुजरातला ट्रेनमध्ये प्रवास करत होता तेव्हा त्याने 4-5 मुस्लिम व्यक्ती उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना ऐकल्या होत्या. हे मुस्लिम प्रवासी उर्दू भाषेत बोलत असल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे. त्यांनी सांगितले की, हे सर्वजण मुंबईतील मोहम्मद अली रोडवर रूमचे भाडे घेऊन राहण्याबाबत बोलत होते. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.