मुंबई : हिंदूंच्या जमिनी बळकावणाऱ्या ‘वक्फ’ला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर ‘ऑल इंडिया उलमा बोर्ड’ या मुस्लीम संघटनेने त्यांचे आभार मानण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रभर बॅनरबाजी केली आहे. ‘जनाब उद्धव ठाकरे साहब का वक्फ बिल के खिलाफ आवाज उठाने के लिए तह दिलसे धन्यवाद’, अशा आशयाचा मजकूर त्यावर लिहिण्यात आला आहे.
भाजपने यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. “महायुती सरकारने जेव्हा शिवरायांच्या गड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू केले, तेव्हा उद्धव ठाकरेंना यामुळेच त्रास झाला होता, हे आज महाराष्ट्राच्या जनतेला समजले. जनतेने उद्धव ठाकरेंकडून ‘शिवसेना’ नाव काढून ‘टीपूसेना’ नामकरण का केले, याचे हे कारण. मतांसाठी कोणत्याही थराला जाऊन मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत”, असा हल्लाबोल भाजपने केला आहे.
वक्फ बोर्डाला समर्थन देणाऱ्या असदुद्दीन ओवैसीचे देखील असे बॅनर कधी लागले नाहीत. मात्र जनाब उद्धव ठाकरे यांचे बॅनर मुंबईमध्ये झळकत आहेत. महाराष्ट्र हे सर्व पाहतोय आणि याचा हिशोब करणे देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले आहे”, अशी टीका भाजपने ‘एक्स’च्या माध्यमातून केली आहे.