उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर न्यायालयाची सुनावणी, एकनाथ शिंदेसह ४० आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

महाराष्ट्र :  आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पहिली सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभाध्यक्षांना मात्र ठाकरे गटाने प्रतिवादी केले नसल्याने न्यायालयाने त्यांना नोटीस दिली नाही. पुढील सुनावणी १५ दिवसांनी होईल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला व न्या. मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या न्यायासनासमोर ही सुनावणी पार पडली. पुढच्या सुनावणीत एकनाथ शिंदेंना न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे. पुढची सुनावणी १५ दिवसांनी होणार असली तरी

न्यायालयाचे वेळापत्रक आल्यानंतरच
निश्चित तारीख कळू शकेल.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी १० जानेवारीला निकाल दिला. या निकालात त्यांनी कोणत्याही बाजूच्या आमदारांना अपात्र ठरविले नसल्याने उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, तर शिंदे गटाने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिले आहे. दरम्यान, शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाला आधीच नोटीस जारी केली आहे. तिथेही या दोन्ही बाजूंना उपस्थित राहावे लागणार आहे.न्यायालयाचे नियमित कामकाज केंद्र सरकारने २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भात अर्धा दिवस सुटीची अधिसूचना काढली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाचाही उल्लेख होता