उद्धव ठाकरे यांचे सभा स्थळी आगमन

जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचार्थ  आज जळगावात सभा पार पडत आहे.  या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले आहे. त्यांनी यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

यावेळी महाविकास आघाडीतर्फे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.  याप्रसंगी विश्वम्भर चौधरी, माजी आमदार सतीश पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे, माजी महापौर जयश्री महाजन, वैशाली पाटील, प्रतिभा शिंदे, उदय पाटील, श्याम तायडे आदी उपस्थित होते.