उन्मेश पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झालाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

जळगाव : रामदेववाडी अपघातास कारणीभूत असणाऱ्या गुन्हेगारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे नेते उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केला होता. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला. उन्मेश पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.रामदेववाडी अपघात प्रकरणाबाबत बोलताना उन्मेश पाटील म्हणाले होते की, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अपघातात दोषी असलेल्यांना संरक्षण दिले जात आहे. गोरगरिबांवर अन्याय करण्याचे काम ते करीत आहेत.

दोर्षीना मुंबईला पाठवण्यात यांचा हात असल्याचा आरोप रामदेववाडी अपघातप्रकरणात उन्मेश पाटील यांनी केला होता. दरम्यान, उन्मेश पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असा पलटवार मंत्री गिरीश महाजन यांनी केला.मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, उन्मेश पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ज्याठिकाणी हा अपघात घडला. त्याठिकाणाची माणसे ही माझ्याच मतदारसंघातील असून अतिशय गरिबीची त्यांची परिस्थिती आहे.

म्हणून मी स्वतः ११ वाजेपासून २.३० वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो. मी पोलिसांसोबत बोललो. गुन्हा दाखल करायला लावला. त्या गाडीत गांज्याच्या पुड्या होत्या. त्याचाही उल्लेख मी त्याठिकाणी करायला लावला. निकालाच्या दिवशी आपली पत कळेलच !’ग्रामस्थांनी गाडीवाल्याला मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने त्याला मुंबईला हलवावे लागले. मात्र, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हणून काही तरी वेड्यासारखे बडबडायचं आणि काहीही बोलायचं. म ला मात्र, उन्मेश पाटलाला उत्तर द्यायची गरज नाही. त्याला म्हणा ४ तारखेला निकालाच्या वेळेला समोर ये आणि बघ आपली जिल्ह्यात काय पत आहे, असेही ना. महाजन म्हणाले.