राजधानी दिल्लीसह देशभरात हवामानाचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळत आहेत. पण मार्च महिन्यात दिल्ली-एनसीआरमधील हवामान होळीच्या रंगांप्रमाणे रंग बदलत आहे. मार्च महिना थंडीने सुरू झाला, महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर पुन्हा थंडी वाढली. दिवसा कडक उन्हामुळे लोकांना उकाडा जाणवत होता, मात्र आता पुन्हा वातावरण आल्हाददायक होणार आहे.
जळगावचे तापमान दोन अंशांनी वाढणार !
जागतिक हवामान बदलाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आगामी २६ वर्षांमध्ये जळगाव जिल्ह्यात हवामान बदलाचा त्रुतुमानावर मोठा परिणाम होऊन सरासरी तापमानात दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. “सेंटर फॉर स्टुडी सायन्स” टेकनॉलॉजी ऍण्ड पॉलिसी” या संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे.