उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना प्रदान होणार ‘हा’ पुरस्कार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस ऑगस्टमध्ये जपान दौर्‍यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने यासंबंधीची घोषणा केली होती.

कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून, ती देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात तसेच महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्यासाठी ही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. Devendra Fadnavis कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांतातील आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता कार्यक‘मात प्रामु‘याने उपस्थित असतील. 2015 मध्ये फडणवीस जपान दौर्‍यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. 2018 आणि 2023 मध्येही त्यांनी जपानला भेट दिली होती.