मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीए असल्याचे दाखवून फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींवर 15 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सामाजिक काम करण्याच्या नावाखाली या आरोपींनी फसवणूक केली. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम १७०, ४१९, ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी सुहास महाडिक याच्याविरुद्ध मुंबईच्या आग्रीपाडा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.