अकोला: अकोला, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आज वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला आहे. हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी. डी. चव्हाण आणि अकोला जिल्ह्यातील संगीत कांबे यांनी हा प्रवेश केला आहे.
संगीत कांबे हे २० वर्षापासून राजकरणात आहे. तसेच त्यांच्या पत्नी अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे विद्यमान शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गायत्री कांबे या आहेत आहेत. कांबे हे ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख आहेत. आज त्यांनी अकोला जिह्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह वंचितमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.
तर बी. डी. चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत , १९९७ साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती. नंतर २००९ साली त्यांनी बसपा तर्फे निवडणूक लढवली, तर २०१४ मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता.बी डी चव्हाण हे २००९ पासून हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. पण तब्बल तीन वेळा चव्हाण त्यांची लोकसभेची उमेदवारी नाकारली गेलीय. चव्हाण हे वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. त्यांना वंचितकडून उमेदवारीही निश्चित असल्याची माहिती आहे.