जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ आज २५ रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले आहेत. तर जळगाव मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मारुतीचे दर्शन घेतले आहेत.
भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येईल.
तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल. यानंतर दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाला सूरवात होईल या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे तसेच महायुतीचे समन्वयक आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक संजय पवार, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अमोल हरिभाऊ जावळे , जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख निलेश पाटील , शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीनल पाटील, सोनाली पाटील, शिवसेनेच्या सरिता माळी-कोल्हे , गणेश सोनवणे , RPI आठवले गटाचे आनंद खरात , आठवले RPIचे अनिल अडकमोल, RPI कवाडे गट राजू मोरे , लहूजी सेना दिनेश खरात , श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.