उष्मघातामुळे अनेकांचा मृत्यू : एकनाथ खडसेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यात होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनीे केली आहे.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे.पत्रात पुढे म्हटलं आहे की, मागील ४ ते ५ दिवसापासून तापमान प्रमाण जास्तच वाढलेले आहे. यात जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचे देशात उचांक गाठला आहे. उष्माघाताने जिल्ह्यातील बर्‍याच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

यामध्ये माझ्या परिचयाचे काही नागरिक उष्माघाताने दगावले आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. उष्माघातापासून संरक्षणासाठी शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सूचना करण्यात येतात परंतु, शेतकरी, शेत मजूर, बांधकाम मजूर आदींना नाईलाजास्तव भर उन्हात काम करावे लागते, व अश्या परिस्थितीत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सदर नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत पुरविण्यात येत नाही अथवा कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नाही. तरी राज्यात उष्माघातामुळे होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून, मृतांच्या परिवारास शासनातर्फे कमीतकमी ५ लाख रुपयेआर्थिक मदत मिळणेसाठी आपल्या स्तरावरून तत्काळ योगती तरतूद करण्यात यावी ही विनंती.