जळगाव : उसने पैसे परत मागितले असता त्याचा राग आल्याने झालेल्या वादात एकास तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना प्रजापती नगर येथे घडली. याप्रकरणी तालुक पोलिस स्टेशनला संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रजापत नगर येथील दिनेश मांगीलाल ओझा यांच्याकडून नंदकिशोर रामगोपाल वर्मा (रा. उस्मानिया पार्क) यांनी २ लाख पैसे उसने घेतले होते. बुधवार, १८ सप्टेंबर रोजी दिनेश ओझा हे नंदकिशोर रामगोपाल तिवारी यांच्यासोबत गप्पा मारत होते. या गप्पांदरम्यान दिनेश ओझा यांनी सांगितले की, मी तुला दिलेले २ लाख रूपये मला लवकर परत कर. दिनेश यांनी पैसे परत मागितल्याचा राग येऊन नंदकिशोर रामगोपाल तिवारी, कैलास देविलाल उपाध्ये (रा. पटेल नगर, जळगाव), आणि राहूल पाटील (रा. राजाराम नगर, जळगाव) या तिघांनी दिनेश यास शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात दिनेश गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी दिनेश ओझा यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मारहाण करणारे नंदकिशोर रामगोपाल तिवारी, कैलास देविलाल उपाध्ये , आणि राहूल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.