मुंबई : हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात आज एकाच दिवशी ३,१६,३०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून ८३,९०० रोजगार उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, कृषी मूल्य साखळी अंतर्गत शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्याशी करार करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे सामंजस्य करार आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यातील उर्जा क्षेत्रात एकूण ७ कंपन्यांशी हरित ऊर्जा निर्मितीसाठी २,७६,३०० कोटी रुपयांचे करार करण्यात आले.
यातून ६३,९०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. दुसरा सामंजस्य करार महाराष्ट्रात हरित पोलाद प्रकल्पासाठी करण्यात आला. आर्सेलर मित्तल निप्पॉन इंडिया आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागाशी झालेल्या या करारात एकूण ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून, २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या करारांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषिमूल्य साखळी वेल्सपन गोदावरी जीएचर प्रा. लि. २९,९०० कोटी १ हजार भागिदारी बैठकीत उपस्थित राहह्न मनोगत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले की, आज सर्वांत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले, ज्याची आमच्या शेतकरी बांधवांना गरज आहे. अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांच्यासमवेत करार झाले. यामुळे शेतकरी आपला माल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत.