भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपाला बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना मित्र पक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, काही विरोधी नेत्यांनी नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चंद्राबाबू नायडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाला बहुमत न मिळाल्यामुळे त्यांना मित्र पक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, ४ जून रोजी लोकसभा निकालादरम्यान शरद पवार यांनी आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीमध्ये प्रवेश केलेल्या नितीश कुमार यांच्याशी संपर्क केल्याचे वृत्त समोर आले होते. यावर आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मी त्यांच्याशी बोलणार नाही. आमच्या (भारतीय आघाडी) बैठकीत निर्णय होईल, तेव्हा मी बोलेन. आत्तापर्यंत मी त्याच्याशी बोललो नाही असे शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले चंद्राबाबू नायडू ?
चंद्राबाबू नायडू यांनी त्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएमध्येच राहणार असून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. तसेच आपण आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.