एप्रिलमध्ये इतके दिवस बँका बंद राहतील, इतके दिवस आहे सुट्ट्यां

Bank Holiday: एप्रिल 2024 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास, RBI ने जारी केलेल्या सुट्ट्यांची यादी येथे पहा. एप्रिल 2024 मध्ये, 30 दिवसांपैकी 14 दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँक सुट्ट्या आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.

गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीमुळे ९ एप्रिल रोजी देशातील अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल. ईदमुळे 10 एप्रिल रोजी कोचीमध्ये बँका बंद राहतील. ईदनिमित्त 11 एप्रिल रोजी संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल. 13 आणि 14 एप्रिलला दुसरा शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल.

बोहाग बिहू आणि हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला येथील बँकांमध्ये १५ एप्रिलला सुट्टी असेल. 17 एप्रिलला रामनवमीनिमित्त देशातील अनेक शहरांतील बँकांना सुट्टी असेल. आगरतळा येथे 20 एप्रिल रोजी गरिया पूजेमुळे बँका बंद राहतील. 21 एप्रिल रोजी रविवारची सुट्टी असेल. चौथा शनिवार आणि रविवार असल्याने 27 आणि 28 एप्रिल रोजी देशभरातील बँका बंद राहतील. अशा स्थितीत येथील सुट्ट्यांची यादी पाहूनच तुमच्या कामाचे नियोजन करावे.