जळगाव : यावर्षी उन्हाळ्याचा सुरुवातीलाच उष्णतेची भयानक लाट आलेली असून तापमाने रुद्र रूप धारण असल्याने केलेले एप्रिल हिट ठरला असून सूर्य आग ओकू लागल्याने सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. यंदाच्या मोसमातील या आठवड्यात तापमान अधिक वाढत्याने शितपेयांच्या दुकानामध्ये गर्दी वाढलेली आहे. घरातील कुलर, पंखे एसीसह उकाड्यापासूनन संरक्षण मिळणाऱ्या वस्तू दुरुस्ती, तथा नविन वस्तु खरेदीसाठी इलेक्ट्रिक तथा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांम ध्येही ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
तसेच शहरातील विविध चौकात तथा सार्वजनिक ठिकाणी शितपेयाची दुकाने थाटलेली असून यात रसवंती, मावा कुल्फी, ज्युस, लस्सी, आईस गोळा, आईस्क्रीम यासह विविध शितपेयाची मागणी वाढलेली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी नागरीकांचा याकडे कल वाढलेला आहे. तसेच घरातील कुलर पंखे सुधारण्यासाठी इलेक्ट्रिकच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी लागली आहे. उन्हाच्या लाटेमुळे अबालवृद्धांची पुरती दमछाक झाल्याचे दिसून येत आहे.
रस्ते सामसूम असून लग्न सराई असताना सुद्धा बाजारपेठामध्ये शुकशुकाट आहे. तालुका वासियांसाठी दरवर्षी येणारा उन्हाळा तसा नवा नाही. मात्र यंदा उन्हाने सुरुवातीलाच तापमान भरपूर असून तापमानाची वाटचाल वाढतांना दिसून येत आहे. उन्हात दुचाकी उभी राहिल्यास सिट गरम होते व प्रवास करतांना खुप त्रास होतो. शासकीय कार्यालयातील कामकाजावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे. उष्णता व उकाड्यामुळे वृद्ध व लहान मुलांची सर्वाधिक दमछाक होत आहे.
काहीजण छत्री तर काहीजण पांढऱ्या मोठा रूमालाचा आधार घेताना दिसून येत आहेत. शेतीची कामे उन्हामुळे सकाळच्या सत्रातच आटोपली जात आहेत. शेतावर कामावर जाणाऱ्या शेतमजुरांनी सुद्धा आपल्या कामाच्या वेळा बदलल्या असून सकाळी दुपारी १ वाजेपर्यंतच कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. यापुढील तीन महिने अखेरपर्यंत उष्णता राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.उन्हाचा चढता पारा पाहता आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावे. बाहेर जातांना काळजी घ्यावी. सोबत पाणी बॉटल असू द्यावी. पांढऱ्या रंगाचा पातळ, खादी पोशाख वापरावा. उष्माघाताचा धोका टाळावा असे आवाहन आरोग्य