एमपीडीए कायदया अंतर्गत तिघांवर स्थानबध्दची कारवाई

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील ३ गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत स्थानबध्दची कारवाई करण्यात आलेली आहे. यात शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा समावेश आहे.

रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक बाजू कोळी (वय ३६ रा. साईबाबा मंदिर जवळ समतानगर, जळगाव) याचे विरुध्द दारुबंदी कायदया अंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, राजेंद्र कुटे यांनी प्रस्ताव दिला. यानुसार त्यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानबध्द भुषण ऊर्फ भासा विजय माळी (वय २४ रा.भुई काटयाच्या मागे तुकाराम वाडी जळगाव) याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सदरचा प्रस्ताव हा सादर केला. या स्थानबध्द यास कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे. अमळनेर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४ रा. पिंपळे रोड संविधान चौक लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर जि. जळगाव) याचे विरुध्द भादंवि कायदया अंतर्गत २७ गुन्हे दाखल आहेत. अमळनेर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.