जळगाव : कोणत्याही घडामोडी, प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी येथे सदैव तत्पर राहणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची समर्पण भावना हेच येथील पोलीस दलाच्या यशाचे गमक आहे. यातूनच जिल्ह्यात एमपीडीएसारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात होऊ शकल्या व दंगलीसारख्या प्रसंगांना वेळीच नियंत्रणात आणाता आले, अशा भावना मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केल्या. पदोन्नतीने बदली झालेले एम. राजकुमार यांना रविवार, ४ फेब्रवारी रोजी संध्याकाळी निरोप देण्यात आला तर नूतन पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांचा स्वागत समारंभ रविवार, ४ फ `ब्रुवारी रोजी मंगलम सभागृहात झाला.
व्यासपीठावर या दोन्ही अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), कविता नेरकर (चाळीसगाव), एम. राजकुमार यांच्या पत्नी रम्या कन्नन उपस्थित होते. पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतला असून आता पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकायनि कायदा व सुव्यवस्थेविषयीच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असल्याचे एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी नमूद केले. एम. राजकुमार यांचे व माझे काम या पूर्वीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जवळपास सारखे राहिले असून आताही जळगावातून त्यांच्याकडून पदभार घेतला आहे. त्यांनी
येथे जे काम केले त्याची प्रेरणा घेऊन आपणही काम करू व जळगावचे नाव उंचावणार असल्याचे ते म्हणाले. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने अनेकांना प्रेरणा दिली असून त्यांच्या मोठ्या मनाचे कौतूकही केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.. या वेळी अशोक नखाते, कविता नेरकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, अन्य कर्मचाऱ्यांसह शहरातील मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास माजी महापौर जयश्री महाजन, जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोउनि रेश्मा अवतारे यांनी केले