ऑनलाईन गेमर्ससाठी केंद्रसरकार कडून महत्वाच्या टिप्स !

गेमर्ससाठी गृह मंत्रालयाच्या सुरक्षा टिप्स :  स्मार्टफोन गेमर्सना पैसे कमावण्याचं आमिष दाखवून त्यांना काही लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं. यानंतर यूजर्सचा सर्व डेटा, त्यांचं गेमिंग अकाउंट आणि पर्यायाने त्यात असणारे पैसेदेखील हॅकर्सच्या ताब्यात जातात. कित्येक प्रकरणांमध्ये यूजर्सचे बँक डीटेल्स चोरीला जाऊन मोठी फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे.

गृह मंत्रालयाच्या सायबर विभागाने ऑनलाईन गेम खेळणाऱ्या यूजर्सना इशारा दिला आहे. गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावं असं गेमर्सना सांगण्यात येत आहे. हा इशारा विशेषतः स्मार्टफोनवर गेमिंग करणाऱ्यांसाठी आहे.

> ऑनलाईन मल्टिप्लेअर गेम्स खेळताना समोरच्या अनोळखी प्लेअरसोबत चॅट करताना आपली खासगी माहिती त्यांना देऊ नका.

> ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या गेमची वेबसाईट आणि पब्लिशर याबाबत माहिती घ्या.

> कोणत्याही ऑनलाईन गेमला केवळ अधिकृत वेबसाईट, गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

> गेमिंग अ‍ॅप खरेदी करताना योग्य लिंकवर क्लिक केलं आहे याची खातरजमा करा. कित्येक वेळा नकली सबस्क्रिप्शन लिंकवर क्लिक केलं जाऊन फसवणूक होऊ शकते.