जळगाव : ऑनलाईन पार्टटाईम द जॉबची ऑफर देवून व्यापाऱ्याकडून ७ लाख ७९,३०० रुपयांची ऑनलाईम रक्कम स्विकारुन सायबर ठगांनी फसवणूक की केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सागर चिरमाडे (२६) हेहै – व्यापारी असून शारदा कॉलनीत वास्तव्यास आहेत. रविवार, ४ ग फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्याशी अनोळखी 5. व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.जास्तीचा फायदा करून देण्याच्या भन्नाट आयडिया सांगितल्या.
ऑनलाईन पार्टटाईम जॉबची ऑफरही दिली. या जॉबसाठी काही पैशांची गुंतवणूक करावी लागेल, असे सांगतव्यापाऱ्याला जाळ्यात ओढले. ४ फेब्रवारी जळगाव ते बुधवार, ७ फेब्रुवारी दरम्यान त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन ७ लाख ७९ हजाराहून अधिक रकमेचा स्वीकार केला. त्यानंतर सायबर ठगाने त्यांनी मोबदला दिला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास पोनि शिल्पा पाटील करीत आहेत.
जे पी मॉरगन नावाचे वेब पोर्टल तसेच मॉरगन कॅपीटल बल्क स्टॉक ग्रॅप २२ मध्ये ट्रेडिंगमध्ये पैसे गुतवणुक करुन जास्तीचा नफ्याचे अमिष दाखवित सायबर ठगांनी व्यावसायिकाची सुमारे ९ लाख ५४, ६०० रुपयांची रक्कम ऑनलाईन स्विकारुन फसवणुक केली. हा प्रकार १४ नोव्हेंबर २३ ते २३ डिसेंबर २३ दरम्यान घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विमा एजंट राजेश प्रदीपकुमार संचेती रा. पाचोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवार १० रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ऑनलाइन व्यवहार सर्वत्र होऊ लागला. त्याबरोबरच मोबाइलव्दारे सक्रिय ग्राहकांची संख्येत वाढ होत आहे. मोबाइल किंवा ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक होण्याच्या गुन्ह्यातही वाढ होतानाचे चित्र समोर येत आहे. नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
एसबीआय बँकेतून बोलतोय सांगत महिला व्यावसायिकालाही फसविले
ग्राहकाच्या मोबाईलवर फोन केला. मी एसबीआय क्रेडीट कार्ड कार्यालयातून बोलत आहे, असे सांगून सायबर ठगाने तुमचा क्रेडीट कार्ड प्लॉन बंद करून देतो, अशी थाप दिली. तक्रारदाराच्या क्रेडीट कार्डमधील फोन पे अकाऊंटमधून १ लाख १३, ६६४ रुपयांचे ऑनलाईन ट्राजेंक्शन करून फसविले. मंगळवार ६ रोजी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. महिला व्यावसायिक सीमा जैसवाल (रा. देउळगाव गुजरी, ता. पारोळा) यांनी शुक्रवार, ९ रोजी तक्रार दिली. त्यानुसार पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल झाला. तपास पोनि सचिन सानप करीत आहेत.