ऑपरेशन सद्भाव अंतर्गत भारत करणार ‘या’ तीन देशांना मदत

नवी दिल्ली : चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या देशांना मदतीचा हात म्हणून,भारताने रविवारी ऑपरेशन सद्भाव राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, व्हिएतनाम आणि लाओस या दोन देशांना प्रत्येकी १ लाख डॉलरचं अर्थसहाय्य करण्याच निणर्य घेतला आहे. यागी या चक्रीवादळामुळे आतापर्यंत शेकडो लोक दगावले असून, आता पर्यंतचे सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ मानलं जात आहे.

सरकारने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जलशद्धी उपकरणं, पाण्याचे कंटनेर, सौर कंदील, स्वयंपाकघरातील सामग्री यासह, ३५ टनांच्या सामग्रीची मदत व्हिएतनामला रवाना करण्यात आली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे लाओस या देशात, जवळपास ४०,००० लोकांचं नुकसान झालं आहे. म्यानमार या देशात १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, तिथे सुद्धा तात्काळ मदत पाठवण्यात आली आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले ” ‘यागी’ या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. म्यानमार, व्हिएतनाम, आणि लाओस या देशांना तत्काळ मदत रवाना करण्यात आली आहे. यागी या चक्रीवादळामुळे पहिल्यांदा फिलिपाइन्स मध्ये भूस्खलन झालं. नंतर, वादळाने आपला मोर्चा व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार आणि लाओस या देशांकडे वळवला.