---Advertisement---

ऑरेंज अलर्ट; या जिल्ह्यांमध्ये पडणार अतिमुसळधार पाऊस; वाचा वेदर रिपोर्ट

---Advertisement---

मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. मान्सूनने एन्ट्री करताच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार तर कुठे तुरळक पावासाच्या सरी बरसल्या. आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातार्‍याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण पट्ट्यामध्ये रत्नागिरी, रायगड ते पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढून काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारी पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अ‍ॅलर्टचा इशारा कायम आहे.

पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर आणि दक्षिण कोकणामध्ये सर्वदूर पावसाचा अंदाजही आहे. या काळात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रातही पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यातही मंगळवारी बहुतांश ठिकाणी पाऊस पडून नंतर जोर कमी होईल. पूर्व आणि पश्चिम विदर्भात मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment