---Advertisement---
ओडिशाच्या गंजम जिल्हयातील गोपालपूर येथील झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (झेडएसआय) प्रादेशिक केंद्राच्या शास्त्रज्ञांनी राज्यातील मुहान परिसंस्थेतील स्नेक ईलच्या नवीन प्रजातीचा शोध लावला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
राज्य मत्स्य विभागाचे माजी सहसंचालक सूर्यकुमार मोहंती यांच्या स्मरणार्थ या नवीन प्रजातीला ‘ओफिचथस सूर्याई’ असे नाव देण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बालासोर जिल्हयातील तलासरा येथील सुवर्णरखा नदी,
जगतसिंगपूर जिल्हयातील पारादीप आणि गंजाम जिल्हयातील सुनारपूरजवळील बहुदा नदीतून मागील वर्षी वेगवेगळया वेळी किमान
विविध चाचण्या केल्यानंतर ती एक नवीन प्रजाती असल्याला आम्ही दुजोरा देतो, असे झेडएसआयच्या गोपाळपुरातील एस्टुरिअन बायोलॉजी प्रादेशिक केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल महापात्रा यांनी सांगितले.
मूळ प्रजाती त्याच्या जवळ संलग्न असलेल्या ओफिचथस ॲलेनी, ओफिचथस झोफिस्टियस आणि ओफिचथ, अल्टिपेनिस आणि या वंशातील इतर सदस्यांपासून मास्यांचे श्वसनेंद्रीय उघडण्याच्या अगदी वर किंवा किंचित पुढे असतात, त्याची अद्वितीय कशेरुकी संख्या आणि मॅक्सिला आणि मॅन्डिबल दोन्हीवर अनेक पंक्तींचा समावेश असलेल्या दातांच्या नमुन्यामुळे ते ओळखले जाऊ शकतात, असे महापात्रा यांनी सांगितले.
सहा नमुने गोळा करण्यात आले आहेत.
झेडएसआयच्या प्रयोगशाळेत डीएनएचा सखोल अभ्यास आणि
---Advertisement---